नागपूर : इंस्टाग्रामवर ओळखी झालेल्या तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर चार महिने लैंगिक शोषण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवले मात्र लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केली. सारंग भरत पारधी (३०, पेंच पाठबंधारे विभाग कॉलनी, रामटेक) असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सारंग पारधी याची आई पाठबंधारे विभागात नोकरीवर असल्याने तो पारशिवनी येथे राहतो. त्याची इंस्टाग्रामवरून तरुणीशी एप्रिलमध्ये ओळख झाली. तरुणी बीए पदवीच्या अंतिम वर्षाला शिकत आहे. त्यामुळे सारंग तिला महाविद्यालयात जाऊन भेटत होता. तिच्याशी मैत्री केल्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला आमडी ते पारशिवनी रोडवरील सूर्या लॉजवर नेले. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सलग चार महिने लैंगिक शोषण केले.

हेही वाचा – नागपूर : दिवाळीनिमित्त ‘एफडीए’कडून अन्नपदार्थ उत्पादक, वितरकांची झडती, ११८ नमुने तपासणीसाठी पाठवले

हेही वाचा – नागपुरात आशा वर्कर काळी दिवाळी साजरी करणार, हे आहे कारण..

५ नोव्हेंबरला सारंगने तरुणीला लॉजवर नेले. तिच्याशी संबंध ठेवले. तिने लग्नासाठी तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणीने पारशिवनी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून सारंग पारधीला अटक केली.
………