अमरावती : प्रेयसीची आक्षेपार्ह छायाचित्रे तिच्या नियोजित वराला पाठवून एका युवकाने तिचे जुळलेले लग्न मोडले. हा धक्कादायक प्रकार माहुली जहांगिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय रवी मोहिते (२४, रा. वाघोली) याच्याविरुद्ध विनयभंग, सामाजिक बदनामी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
२४ वर्षीय पीडित तरुणीचे आरोपीसोबत दोन वर्षांपूर्वीपासून मैत्री व प्रेमसंबंध होते. पीडित युवतीचे आरोपीसोबतच मोबाईलवर नियमित संभाषण होत होते. ती आरोपी युवकाला व्हिडीओ कॉलदेखील करीत होती. दरम्यानच्या काळात आरोपीने तिची खासगी आक्षेपार्ह छायाचित्रे मोबाईलमध्ये संग्रहित करून ठेवले. काही काळानंतर त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. दरम्यान, अलीकडे फिर्यादी तरुणीचे दुसऱ्या एका तरुणासोबत लग्न जुळले. ही बाब आरोपी विजय याला माहीत होताच त्याने तिचा पिच्छा पुरविला. वारंवार कॉल करून तू माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला. त्यामुळे ती प्रचंड हादरली. तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो समजण्यास तयार नव्हता.
आरोपी विजय मोहिते हा तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मोबाईलमध्ये संग्रहित करून ठेवलेले युवतीचे आक्षेपार्ह छायाचित्रे व तिने त्याच्याशी पूर्वी व्हॉट्सअॅपवर केलेले चॅटिंग तिच्या भावी पतीला पाठविले. त्यामुळे तिची चांगलीच बदनामी झाली. आक्षेपार्ह छायाचित्रे व चॅटिंग पाहून नियोजित वराने तिच्यासोबतचे लग्न मोडले. त्यामुळे तरुणीला धक्का बसला. तिने माहुली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून विजय मोहितेविरुद्ध गुन्हा नोंदविला.