यवतमाळ : “बाबा मला माफ करा व स्वत:ची काळजी घ्या’, असे चिठ्ठीत लिहून तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी घाटंजी तालुक्यातील मानोली ते आमडी रोडवर असलेल्या शेतशिवारात उघडकीस आली. सूरज मुरलीधर चावके (३०, रा. इस्तारीनगर खापरी, घाटंजी), असे मृताचे नाव आहे. आपल्या मुलाने तिघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार वडिलांनी पाच दिवसानंतर पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तिघांनी संगनमत करून तरुणाला त्रास दिला. हा जाच असह्य झाल्याने तरुणाने शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या ‘बाबा मला माफ करा, स्वत:ची काळजी घ्या, असे लिहून ठेवले. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. मुलाच्या आत्महत्येस तिघे जण कारणीभूत आहे, या आशयाची तक्रार मृताचे वडील मुरलीधर चावके यांनी गुरुवारी घाटंजी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून विलास विश्‍वनाथ हिवराळे (५६, रा. इस्तारीनगर) या व्यक्तीसह अन्य दोघांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. विलाससह अन्य दोघे आपल्या मुलाचा मानसिक छळ करत असल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. घाटंजी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Baba Siddique Murder Case
Baba Siddique : “बाबा सिद्दिकींना ठार मारा, तुम्हाला पाच लाख रुपये, फ्लॅट आणि…”, अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांना काय सांगितलं?
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….
young man kills grandmother for greed for money in raigad
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
Suicide kota
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!
Story img Loader