अनोळखी युवक-युवतीने भरवेगात असलेल्या विदर्भ एक्सप्रेस रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. शेगाव रेल्वेस्थानक नजीकच्या शेगाव नागझरी लोहमार्गावर गुरुवारी रात्री उशिरा ही खळबळजनक घटना घडली.

हेही वाचा >>>भाजप नेते जमाल सिद्धीकी यांना जीवे मारण्याची धमकी

agartala lokmanya terminal express derailed
आसाममध्ये रेल्वेचा अपघात! आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले; जीवितहानी नाही
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Jogeshwari railway station. Emergency drills Jogeshwari railway station,
मुंबई : दोन रेल्वेगाड्यांची टक्कर अन्…
CIDCO houses are outside Navi Mumbai
सिडकोची घरे नवी मुंबईबाहेरच, रेल्वे स्थानकाजवळील घरांचे स्वप्न अधुरे
Environmentalists allege that some trees were uprooted outside the Metro 3 station
‘मेट्रो ३’ स्थानकाबाहेरील काही वृक्ष उन्मळून पडल्याने पर्यावरणप्रेमींचा आरोप
Mumbai municipal administration, water accumulate,
मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन
news of goods train falling off on railway track came out on friday to see readiness of system in nandurbar
नंदुरबार : मालगाडी घसरल्याची बातमी अन…
mumbai heavy rain local down
“माझ्या बाळाला जेवण भरवायचं आहे, प्लीज लोकल सुरू करा”, स्टेशनवर खोळंबलेल्या महिला प्रवाशाची मोटरमनला कळकळीची विनंती!

यासंदर्भात शेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव नागझरी लोहमार्गावर शेगावकडे येणाऱ्या गोंदिया मुंबई विदर्भ एक्सप्रेससमोर, रात्री साडेनऊ वाजेदरम्यान अनोळखी युवक-युवतीने उडी घेतली. यामुळे दोघांचे देह छिन्नविच्छिन्न झाले. प्राथमिक अंदाजानुसार युवक २५ तर युवती २० वर्षांची असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

मृत युवकाचा चेहरा चेंदामेंदा झाला असून रंग निमगोरा आहे. त्याने निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तरुणीचा रंग निमगोरा असून चेहरा गोल, सडपातळ बांधा असून तिने पोपटी रंगाची कुडती व काळ्या रंगाची लेगींज परिधान केले आहे. या मृतची ओळख पटवण्याचे आवाहन शेगाव लोहमार्ग पोलिसांसमोर आहे.