गोदिया : कावडमधील तांब्यात नदीचे पाणी भरत असताना तोल गेल्याने तरुण बाघ नदीत बुडाला. ही घटना आज, रविवारी बाघ नदी येथे घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – वर्धा: ग्रामसेवकास मारहाण करणाऱ्या सरपंचास सश्रम कारावास

हेही वाचा – “अजित पवारांप्रमाणे आज ना उद्या शरद पवारांचेही मतपरिवर्तन होईल,” चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान; म्हणाले, “२०२४ पर्यंत…”

रामनगर, गोंदिया येथे राहणारा १९ वर्षीय व्यंकटेश रिंकू स्वामी रविवारी सकाळी आपल्या साथीदारांसह बाघ नदीवर गेला होता. कावडमध्ये पाणी भरत असताना तोल गेल्याने तो नदीत पडला. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस नदीवर पोहोचले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने व्यंकटेशचा शोध सुरू आहे. बाघ नदीचा प्रवाह जास्त असल्याने शोध पथकाला अडचणी येत आहेत. या घटनेमुळे इतर धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man drowned in the river bagh in gondia while going to fetch water sar 75 ssb
Show comments