नागपूर: मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आलेला एक तरूण मेट्रोतून प्रवास करीत असताना अचानक चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला. पण मेट्रो कर्मचाऱ्यांनी तत्पर्ता दाखवल्याने त्याला सुखरूप त्याच्या गंतव्य ठिकाणी जाता आले.

मध्यप्रदेशातील रहिवासी असलेला पीयूष (२३) आपल्या कुटुंबासह वैद्यकीय उपचाराकरिता नागपूरला आला होता. सोमवारी तो दुपारी सुमारे १२.३० च्या सुमारास मेट्रोने प्रजापती नगर ते सीताबर्डी दरम्यान प्रवास करीत असताना त्याची प्रकृती बिघडली व तो बेशुद्ध झाला.

हेही वाचा… विवाहित महिलेचा लग्नास नकार, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…

डब्ब्यात इतर प्रवाशी घाबरले. त्यांनी याची माहिती मेट्रोतील कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ याची माहिती वरिष्ठ सहकाऱ्यांना दिली. गाडी सीताबर्डी इंटरचेंजवर आल्यावर येथील कर्मचाऱ्यांनी व्हीलचेयरव्दारे मेट्रोच्या नियंत्रण कक्षात नेले. या दरम्यान पीयूश शुद्धीवर आला. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तो त्याच्या कुटुंबियासह बाहेर पडला. पीयूशच्या कुटुंबियांनी मेट्रो कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Story img Loader