नागपूर : मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मित्राच्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या युवकाचे सूत जुळले. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण महिलेच्या दिराला लागली. रात्रीच्या सुमारास महिला आणि तो युवक एकांतात भेटले. दरम्यान, पाळतीवर असलेला दीर तेथे पोहचला. त्याने त्या युवकाला बेदम मारहाणी केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.

राहुल गुप्ता (१९) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुल हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर चोऱ्या, मारहाणीसह विविध ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. त्याची कळमन्यात दहशत आहे. अगदी सोळाव्या वर्षी तो गुन्हेगारी जगतात आला. त्याने गुन्हेगारांच्या हाताखाली काम केले. त्याच्या घराशेजारी त्याच्या टोळीतील मित्र राहत होता. तो मित्र गेल्या काही महिन्यांपूर्वी एमपीडीएच्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात गेला. त्याने कारागृहात जाताना कुटुंबियांकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यामुळे तो नेहमी घरी येत होता. दरम्यान, मित्राच्या पत्नीवर त्याची नजर गेली. त्याने तिच्याशी मैत्री केली आणि मोबाईल क्रमांक दिला. दोघांत संपर्क होऊ लागला आणि काही दिवसांतच दोघेही प्रेमात पडले. ती महिला सासू-सासरे आणि दीरासह राहत होती. दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण महिलेचा दीर याला लागली. बरेचवेळा त्याने राहुल गुप्ताला वहिनीशी असलेले अनैतिक संबंध संपविण्याची धमकी दिली. मात्र, राहुल मानायला तयार नव्हता. २४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास राहुल आणि त्याची प्रेयसी दोघांनी भेटायचे ठरवले. नियोजनाप्रमाणे दोघेही आदिवासीनगरातील एका मंदिरामागील मोकळ्या परिसरात भेटले. दोघांच्याही गप्पा सुरु असतानाच महिलेचा दीर तेथे पोहचला. त्याला रंगेहात पकडल्यानंतर राहुलला त्याने शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दंड्याने चांगला चोप दिला. यात तो गंभीर जखमी झाला. प्रियकराला मारहाण होत असल्याचे बघून प्रेयसीने लगेच अंधारातून घराकडे पळ काढला. 

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही वाचा >>>अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण

उपचार घेण्यास दिला नकार

मारहाणीत राहुल जखमी झाल्याची माहिती त्याची आई विद्या गुप्ता यांना मिळाली. त्या लगेच घटनास्थळी आल्या आणि मुलाला घरी आणले. त्याला  रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहन बोलावले. मात्र, त्याने उपचार घेण्यास नकार दिला आणि घरीच झोपला. बुधवारी सकाळी विद्या गुप्ता यांना राहुल बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यांनी लगेच त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी आई विद्या गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

Story img Loader