नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळखी झालेल्या युवकाने १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरी नेऊन मधुचंद्राच्या रात्रीचा अनुभव घेण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. ती मुलगी गर्भवती झाल्यानंतर बींग फुटले. आईच्या तक्रारीवरून मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. प्रद्युम्न अरविंद फुलझेले (२४, नंदनवन) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली. पीडित १७ वर्षीय मुलगी प्राजक्ता (काल्पनिक नाव) दहावी पास झाल्यानंतर तिने नव्याने स्मार्टफोन घेतला. त्यात इंस्टाग्राम डाऊनलोड केले. काही दिवसांतच तिची इंस्टाग्रामवर आरोपी प्रद्युम्न फुलझेलेशी ओळखी झाली. काही दिवस दोघांचे मॅसेज सुरु होते.

दरम्यान, दोघांत मैत्री झाल्याने भेटी-गाठी वाढल्या. पेंटिंगची कामे करीत असलेल्या प्रद्युम्नने प्राजक्ताला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आयटीआयमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करण्याचे ठरविले. त्यांच्या प्रेमाची वस्तीत चर्चा होती. यादम्याने प्रद्युम्नने तिला लग्न करण्यापूर्वी मधुचंद्राची रात्र साजरी करण्याची कल्पना सुचवली. तिनेही उत्सूकतेपोटी होकार दिला. २० जानेवारी २०२३ मध्ये घरी कुणीही नसताना प्रद्युम्नने प्राजक्ताला घरी बोलावले. घरात लग्नासारखी सजावट केली. त्यानंतर दोघांही मधुचंद्राची रात्र साजरी केली.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ

हेही वाचा >>> अमरावती : पत्‍नीचे परपुरूषासोबत अनैतिक संबंध; झोपेचे सोंग घेऊन..

त्यानंतर चवथ्या महिन्यात प्राजक्ताच्या पोटात दुखायला लागले. तिने आईक़डे तक्रार केली. बजाजनगरातील एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेले. प्राजक्ता गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तिच्या आईला धक्का बसला. तिच्या कानशिलात लावून विचारणा केल्यानंतर प्रद्युम्नने केलेल्या शारीरिक संबंधाबाबत तिने आईला सांगितले. आईने मुलीसह नंदनवन पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रद्युम्नला अटक केली.

Story img Loader