गोंदिया: गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भूषण विलास वाढोणकर (वय २३, वर्ष रा. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. सदर तरुण डॉक्टर गेल्या काही दिवसापासून नैराश्यात होता आणि कुणाशी काहीही बोलत सुद्धा नव्हता, असे त्याच्या सोबत असणाऱ्या इतर डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी घटनस्थळाला भेट दिली व वसतिगृहातील इतरांना विचारपूस केली.

हेही वाचा… दोन महिलांचा विहिरीत पडून मृत्यू

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार देवानंद मलगे यांनी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी असेच एका २० वर्षीय गोंदियाच्या तरुणाने शहरातील हार्मोनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.