नागपूर: समाजमाध्यमांवर छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन इन्स्टाग्रामवरील मित्राने विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करून विनयभंग केला.

ही घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपी तरुणावर गुन्हा नोंदविला आहे. ऋषी रमेश अडीकने (२०) रा. जगनाडे चौक असे आरोपीचे नाव आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ऋषी आणि तरुणीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. दोघांमध्ये ‘चॅटिंग’ सुरु होते. यातून तो तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला.

kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
bombay hc grants bail to 20 year old college student in father murder case
वडिलांच्या हत्येतील आरोपीला जामीन; आरोपीच्या भविष्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाचा निर्णय
mhalunge police arrested house robber seizing 26 jewelry pieces worth ₹18 lakh
घरफोडीतील आरोपी टी-शर्टच्या आधारे ओळखून पकडला
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हेही वाचा… कोकणसह विदर्भातील काही जिल्ह्यांना आज ‘ऑरेंज अलर्ट’

शाळेत येता-जाताना तिचा पाठलाग करीत होता. मोबाईलने तिचे छायाचित्र काढत होता. याबाबत समजताच तरुणीने त्याला सर्व छायाचित्र ‘डीलिट’ करण्यास सांगितले. त्याने तिला होकार दिला आणि अजनी परिसरात भेटायला बोलावले. तेथे तरुणीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. तरुणी घटनेबाबत कुटुंबीयांना माहिती देऊन अजनी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून ऋषीचा शोध सुरू केला आहे.

Story img Loader