लोकसत्ता टीम

अमरावती: एका लग्‍न समारंभात सहभागी होण्‍यासाठी ओळखीच्‍या तरूणासोबत गेलेल्‍या १६ वर्षीय मुलीवर आरोपी तरूणाने परतीच्‍या प्रवासादरम्‍यान एका शेतात तिच्‍या डोळ्यावर दुपट्टा बांधून अतिप्रसंग केल्‍याची घटना मोर्शी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील एका गावात उघडकीस आली आहे.

Chandrashekhar Bawankule, Suresh Bhoyer Congress,
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पिछाडीवर, कॉंग्रेसचे सुरेश भोयर आघाडीवर
Counting of votes stopped in Rajura, Rajura,
चंद्रपूर : राजुरात मतमोजणी थांबवली; कारण…
Wardha District Assembly Result, Arvi, Deoli,
वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय? चारही मतदारसंघांत विजयाकडे वाटचालीची चिन्हे
West Nagpur Constituency, seal machine, Booth No. 33,
नागपूर : बुथ क्रमांक ३३ वर मशीनमध्ये सील नाही – काँग्रेसचा आक्षेप
Yavatmal, Mahayuti , Mahavikas Aghadi,
यवतमाळ : महायुतीच मोठा भाऊ, महाविकास आघाडी दोन ठिकाणी खाते उघडणार?
Nitin Raut, North Nagpur Assembly, BJP North Nagpur Assembly,
राज्यात भाजपचे विजयी मार्गक्रमण पण, नागपुरातील या मतदारसंघात मात्र विभाजनाची खेळी
Nagpur city air quality, Nagpur city, Nagpur city air quality deteriorated,
नागपूरकरांनो सावधान ! शहराची हवा गुणवत्ता ढासळली
Congress candidate Bunty Shelke suffered Election Commission vehicles vandalized on polling night
मध्य नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेला अटकपूर्व जामीन…

या प्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन पीडिताच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी अजय इसन धुर्वे (२१, रा. तरोडा, ता. मोर्शी) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी व फिर्यादी मुलगी परस्परांच्या ओळखीचे आहेत. त्यामुळे ११ जून रोजी आरोपीवर विश्वास ठेवून पीडित मुलगी एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी त्याच्या मोटरसायकलवर बसून सोबत गेली. लग्न समारंभाला उपस्थित राहून दोघेही दुचाकीने परत येत असताना आरोपीने तिला एका पांदन रस्त्याने शेताजवळील नाल्याजवळ नेले. तेथे तिला धमकावून डोळयाला दुपटटा बांधला आणि तिचा गळा दाबून बलात्‍कार केला.

हेही वाचा… शिक्षकांच्‍या एकजुटीसाठी आता काँग्रेसचे प्रयत्‍न; शिक्षक-पदवीधर आमदारांची समिती गठीत

याबाबत तू कुणालाही सांगितले तर, माझी नव्हे तर तुझी बदनामी होईल. मी तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. पीडित मुलीने आरोपीच्या तावडीतून सुटका करीत पळ काढला. त्यावेळी तिला तिचे नातेवाईक दिसले. ती त्यांच्यासोबत सुरक्षितरित्या घरी गेली. ती घरी परतल्यानंतर तिच्या मामीने घडलेली घटना तिच्या आईला सांगितली. तिची आई बाहेरगावहून परत आल्यानंतर मायलेकीने पोलीस ठाणे गाठले.