बुलढाणा: सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असलेले मलकापूर शहर आणि संपूर्ण बुलढाणा जिल्हा आज अक्षरशः हादरला. एका युवकाने ‘टोकाचे’ पाऊल उचलत आपले जीवन संपविले. त्याच्या या आततायी कृत्या बद्धल खळबळ उडालेल्या मलकापूर शहरात तर्क वितर्काना उधाण आले आहे.
मोगल कालीन ऐतिहासिक वास्तूचे अवशेष बाळगणाऱ्या आणि विदर्भाचे प्रवेशद्वार ही मलकापूर ची ओळख. अश्या या नगरीतील साली पुरा भागातील एका युवकाने स्वतःच्या गळयाला धारधार शास्त्राने कापून घेत आपली जीवनयात्रा संपविली. आज बुधवारी संध्याकाळी उशिरा घडलेल्या या खळबळजनक आणि तितक्याच दुर्देवी घटनेचा विस्तृत तपशिल मिळू शकला नाही. प्राप्त प्राथमिक माहिती नुसार तेजस महादेव सोनवणे असे या (आत्मघात करणाऱ्या) २० वर्षीय तरुणाचे नाव आहे.
हे अतिरेकी टोकाचे पाऊल उचलण्या पूर्वी त्याने मलकापूर मधील एका जिवलग मित्राला मोबाईल च्या ‘व्हाट्स अप’ च्या मदतीने संदेश देऊन आपल्या कृत्याची माहिती ( मेसेज) पाठविल्याचे वृत्त आहे. घटना प्रसंगी तेजसचे वडील महादेव सोनवणे आणि आई सौ सोनवणे हे शहरात तपासणी, उपचार साठी एका दवाखान्यात गेले होते. यावेळी तेजसचे आजी, आजोबा घरा बाहेरच्या चौथऱ्यावर बसून गप्पा करीत होते.
हेही वाचा >>>अकोला : सहा विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याची नोकरी गेली, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकही…
घरात कुणीच नसल्याची संधी साधून(!) तेजसने स्वतःच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून घेतले.यामुळे गळा चिरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा करुण अंत झाला.यावेळी तेजस रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. गळ्यावर वार करण्यासाठी तेजसने धारदार शस्त्र वापरल्याने तेजसच्या गळ्यावर खोल आणि गंभीर स्वरूपाची इजा झाल्याने तेजस चा मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी मलकापूर शहर पोलिसांनी धाव घेतली.घटनास्थळाचा पंच नामा केला यानंतर तेजस याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेजसने एवढा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण समजू शकले नाही. मात्र तेजसने टोकाचा निर्णय घेण्याआधी मित्राला व्हाट्सअप संदेश पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मेसेज मध्ये त्याने काय नमूद केले, त्यातील मजकूर काय, त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण नमूद केले काय, याचा उलगडा झाल्यावरच त्याच्या टोकाच्या निर्णयाचे कारण कळणार आहे. या घटनेमुळे मलकापूर पोलीस देखील चक्रावून गेल्याचे वृत्त आहे.
तेजस हा सालीपुरा भागातील (जुने पोलीस ठाणे परिसर) येथे परिवारासह वास्तव्यास होता. तेजस हा घरात एकटाच होता.आई बाबा दवाखान्यात गेलेले होते तर आबा आजी हे घराबाहेर बसलेले होते अशी माहिती आहे.यावेळी तेजसने घरातील धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर वार केले.
तेजस मलकापूर येथील विज्ञान महाविद्यालय येथे प्रथम वर्षचे शिक्षण घेत होता आज बुधवारी घरी आला त्यानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या झाली आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही. यामुळे विविध तर्क वितर्क याना उधाण आले आहे.