अवैध सावकारीतून वसुलीसाठी तगादा व घर बांधकामात झालेल्या आर्थिक फसवणुकीमुळे गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी १३ दिवसानंतर महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नागपूर : विदेशी पाहुण्यांचे लक्ष वेधणार, गडाच्या पायथ्याशी उभे असलेल्या छत्रपतींचा देखावा

अवैध सावकारी करणाऱ्यांनी वसुलीसाठी तगादा लावल्याने अंकुश राऊत (२४) याने आत्महत्या करीत चार पानांची चिठ्ठी लिहून ठेवली होती. नंदकिशोर राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा अंकुश हा उमरीतील एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करत होता. त्याने घर बांधकामासाठी मोठी उमरीतील विजय मालोकार याला ३ लाख रुपयांचे कंत्राट दिल्यानंतरही कंत्राटदार बांधकाम करीत नव्हता, तसेच पैसेही परत देत नव्हता, त्याचा भाऊ अजय मालोकारही पैसे परत करत नव्हता. अंकुशचा मित्र मनोज अळसपुरे याला अंकुश राऊतने अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या मंगला देशमुख हिच्याकडून १ लाख ६० हजार रुपये व्याजाने काढून दिले, मात्र मनोज अळसपुरे हा पैसा भरत नसल्यामुळे मंगला देशमुख ही अंकुशकडे पैशांसाठी तगादा लावत होती.

हेही वाचा- काँग्रेसमधील नाराजीनाट्याला नवे वळण; आदिवासी नेता प्रदेशाध्यक्ष का नाही? अनेक नेते म्हणतात…

अंकुश त्या पैशांचे व्याज भरत होता. त्यानंतरही मंगला देशमुख त्याला शिवीगाळ करीत असल्याने तो तणावात होता. या चौघांमुळे अंकुशने आत्महत्या केल्याचे त्याचे वडील नंदकिशोर राऊत यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मोठी उमरीतील अवैध सावकारी व्यवसाय करणारी मंगला देशमुख, मनोज अळसपुरे, अंकुशच्या घराचे बांधकामाचे पैसे घेऊन काम न करणारे विजय व अजय मालोकार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. अंकुशनेही चिठ्ठीत चौघांच्या नावांचा उल्लेख केला होता. सिव्हिल लाइन पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth committed suicidedue to financial fraud in house construction ppd 88 dpj