भंडारा : शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे जुन्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजता दरम्यान घडली. अभिषेक कटकवार वय २५, रा. टप्पा मोहल्ला असे मृताचे नाव आहे.
हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत. आठ दिवसांपूर्वी मृतक अभिषेक याचे काही तरुणांसोबत सामान्य रुग्णालय परिसरात भांडण झाले होते. याच भांडणातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – गोगलगाय अन् शेतकऱ्यांना करी दे माय धरणी ठाय
आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. भंडारा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.