बुलढाणा: जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव गावातील युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर (पोस्ट) टाकल्याने गावात तणाव निर्माण झाला. गावकऱ्यांनी टायर जाळून व गावबंद करून घटनेचा निषेध नोंदवला. यामुळे पोलिसांचा मोठा फोजफाटा गावात तैनात करण्यात आला असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

एका युवकाने इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे आज, मंगळवारी लक्षात आले. परिणामी गावकऱ्यांत तीव्र प्रतिक्रिया उमटली. गाव बंदचे आवाहन करून रस्त्यावर टायर जाळण्यात आले.

हेही वाचा… “मराठा आरक्षण देण्याची भाजपाची इच्छाच नाही,” सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, ‘‘केंद्रात पूर्ण बहुमताची सत्ता असली तरी…’

गावामध्ये खामगाव पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून सध्या तेथे तणावपूर्ण शांतता आहे. सदर युवकाला पोलिसांनी तत्काळ अटक केल्याने तणाव काहीसा निवळला आहे.

Story img Loader