अवैधरित्या चाकू विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनी परिसरातून अटक केली. आरोपीकडून विविध प्रकारचे तब्बल २३ चाकू जप्त करण्यात आले आहेत.सय्यद आमीन सय्यद सादीक (२३, रा. पठाणपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सय्यद आमीन हा जाकीर कॉलनीजवळील महापालिकेच्या बगीच्याजवळ अवैधरित्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात चाकू बाळगून असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सय्यद आमीनला अटक केली. त्याच्याजवळून विविध प्रकारचे तब्बल २३ चाकू जप्त करण्यात आले. या प्रकरणी सय्यद आमीनविरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : झगमगते आयुष्य जगण्यासाठी मुख्याध्यापकाचे अपहरण ; घटस्फोटित नवऱ्याच्या मदतीने प्रेयसीचे कृत्य

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, निवृत्ती काकड, प्रशांत वडनेरकर आदींनी केली. हे चाकू आरोपीने कशासाठी मागवले होते, याची चौकशी पोलीस करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youth was arrested for illegally selling knives amravati amy