चंद्रपूर: राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्ती वॉर्ड क्रमांक दोन साई मंदिर येथील रहिवासी संदीप देवराव निमकर (वय २८) या युवकाची रामपुरच्या जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली. संदीप निमकर हा युवक आई वडिलांसह राहत होता. संदीप सोमवार ९ ऑक्टोंबरच्या रात्री आठ वाजता घरून निघून गेला. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिली होती. तोपर्यंत नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.

मित्रांसोबत जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोधत असताना रामपुर लगतच्या जंगलात माथरा रोड जवळ शोध घेत असताना झुडपात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह पडलेला दिसून आला. घटनेची माहिती राजुरा पोलिस यांना दिली. ठाणेदार योगेश पारधी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे उपस्थित राहून घटनेचा पंचनामा करून समोरील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड
MRTP, illegal building, Adivali Dhokali,
कल्याणमधील आडिवली-ढोकळीत बेकायदा इमारतीच्या विकासकांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा
Story img Loader