अकोला : दुचाकीचा धक्का लागल्याच्या  कारणावरून एका युवकाचे चार ते पाच जणांनी लाठी-काठीने हल्ला करून  निर्घृण हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील दानापूर गावात शुक्रवारी रात्री घडली. देवानंद उत्तम तायडे (२८) असे मृतकाचे नाव आहे. हिवरखेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावात शुक्रवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद तायडे हा दुचाकीने घरी जात होता. त्याच्या वाहनाचा धक्का रस्त्यात उभ्या असलेल्या काही जणांना लागला. या कारणावरून चांगलाच वाद पेटला. वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ या तरूणांनी केली. या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने वार केले.

या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंद तायडे याला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Story img Loader