शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात नागपूर पोलिसांना अपयश येत आहे. शहरातील पोलिसांचा वचक संपला आहे. चक्क दिवसाढवळ्या चार आरोपींनी हातात तलवारी घेऊन भरचौकात एका व्यक्तीचा पाठलाग करून हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज बुधवारी कैकाडीनगरात घडली असून या घटनेमुळे सामान्य नागरिकांत खळबळ उडाली आहे. सागर नागले (३२, पांढराबोडी, अंबाझरी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा दुचाकीने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळून जात होता. दुचाकीने आलेल्या चार आरोपींनी हातात तलवार घेऊन सागरचा पाठलाग केला. कैकाडीनगर चौकात असताना त्यांनी सागरला घेरले. जीव वाचवण्यासाठी सागर धावायला लागला असता आरोपींना हातात तलवारी घेऊन त्याचा पाठलाग केला व तलावारीने हल्ला केला. सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. एका युवकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

हेही वाचा : नागपूर कारागृह पुन्हा चर्चेत, ड्रग्स तस्कर आबू खानला कुख्यात कैद्याने केली मारहाण

घटना घडल्यानंतर काही वेळानंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी जखमीला नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. कैकाडीनगर चौकात सागरवर चारही आरोपी तलवारीने वार करीत होते. सागर ‘वाचवा… वाचवा’ अशी मदतीची हाक देत होता. चौकातील अनेक जण घटना बघत होते परंतु रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला बघूनही कुणी त्याला मदत करायला पुढे आले नाही.