बारावीच्या विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिला व आजीला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. तसेच तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे मारहाण केली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश ईश्वर ठाकरे (२२, एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी स्विटी (काल्पनिक नाव) एमआयडीसी परिसरात आपल्या आजीसह राहते. आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे ती बजाजनगरातील एका खासगी कार्यालयात नोकरी करते. वृद्ध आजीला हातभार लागावा, यासाठी ती अभ्यासासह दोन पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडली. परंतु, स्विटीचा आरोपी आकाश ठाकरे याने पाठलाग करणे सुरू केले. तो तिच्या घरापर्यंत तिच्या मागे येत होता. १ सप्टेंबर २०२२ ला आरोपी आकाशने तिला रस्त्यात अडवले. त्याने मैत्री करायची असून मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तिने मोबाईल क्रमांक देण्यास नकार देत पुन्हा त्रास देऊ नको, अशी तंबी दिली. त्यानंतरही तो तिचा पाठलाग करीत होता.
हेही वाचा- नागपूर : बैरोजगारीची समस्या, रेल्वेतील ड श्रेणी नोकरीसाठी उच्च शिक्षितांची गर्दी
आजीला मदत करण्याच्या बहाण्याने आकाश तिच्या घरी आला. त्याने आजीशी गोडीगुलाबी लावून स्विटीचा मोबाईल क्रमांक घेतला. तेव्हापासून तो तिला मॅसेज पाठवायला लागला. १२ सप्टेंबरला तो स्विटीच्या घरात घुसला. त्यावेळी आजी घरी नव्हती. त्याने स्विटीला शारीरिक संबंधाची मागणी केली. नकार दिल्यास आजीला ठार मारण्याची धमकी दिली. ‘तू कामावर गेल्यानंतर आजीचा गळा आवळून खून करणार’ अशी धमकी दिल्यामुळे स्विटी घाबरली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आकाशने बळजबरी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो तिला नेहमी फोन करीत होता. फोन न उचलल्यास आजीला सांगून बदनामी करण्याची धमकी देत होता. त्याने वस्तीतही अनेकांना प्रेमप्रकरण असल्याचे सांगून स्विटीची बदनामी करीत होता. आकाश हा वारंवार तिच्या घरी जाऊन धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.
हेही वाचा- “संजय राऊतांचा मला फोन आला आणि त्यांनी…”, आमदार कपिल पाटलांनी सांगितला उमेदवार माघारीचा किस्सा
आकाशच्या वारंवार लैंगिक शोषणाला स्विटी कंटाळली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्यापासून लपून नोकरीवर जात होती. दहशतीत जगत असलेल्या स्विटीला तिच्या कार्यालयात जाऊन आकाशने मारहाण केली. तिला शारीरिक संबंधास नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे स्विटीने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी आकाशला अटक केली.