अकोला : केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘यूआयडीएआय’ (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) विभागाने नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार दहा वर्षापूर्वी काढण्यात आलेले आधार कार्ड नव्याने अद्ययावत करावे लागणार आहे. अद्ययावत न केलेले आधार कार्ड रद्द केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात एक विशेष आणि महत्त्वाची ओळख म्हणून आधार कार्ड लागू केले. २०११ पासून आधार नोंदणीला देशभरात सुरुवात झाली. यावेळी सुरुवातीला नागरिकांची प्राथमिक माहिती भरून घेण्यात आली. मात्र, यावेळी बहुतांश व्यक्तींकडून कुठलाही पुरावा मागण्यात आला नव्हता. २०१३-१४ पर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू होती. आता नव्या नियमानुसार या दोन ते तीन वर्षांतील आधार कार्ड धारकांना रहिवाशी पुराव्यात बदल किंवा तोच असला तरी नव्याने ओळखपत्र व रहिवासी पुरावा जोडून आधारची ‘केवायसी’ करावी लागणार आहे.

हेही वाचा – अमरावती: थरारक… अमरावतीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची हत्या, विद्यार्थी जखमी

आधार कार्ड आता नव्या स्वरुपात कार्यान्वित झाले. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आधार केंद्र संचालकांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यातील सात लाख ४७ हजार नागरिकांचे आधारकार्ड अद्ययावत करावे लागणार आहे. भ्रमणध्वनी क्रमांक आधारशी संलग्न असल्यास त्यांना त्यावर संदेशदेखील पाठविण्यात आले आहेत. दहा वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या आधार कार्डधारकांचा रहिवाशी पत्ता बदलला नसला तरी पुन्हा रहिवाशी पुरावे व ओळखपत्र सादर करून ग्राहकांना आधार कार्ड अद्ययावत करावे लागेल.

नागरिकांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध ठिकाणी आधार नोंदणी शिबिरेदेखील आयोजित करण्यात येत आहेत. या शिबीरांचा नागरिकांनी लाभ घेऊन आधार अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता आर्वीकर सरसावले; वर्धा, हिंगणघाट की आर्वी, कोण बाजी मारणार?

…तर आधार क्रमांक निलंबित

आधार अद्ययावत न केल्यास त्यांचा आधार क्रमांक ‘यूआयडीएआय’ विभागाकडून निलंबित केला जाईल. त्यामुळे संबंधित नागरिक आधारशी संबंधित इतर सेवांपासून वंचित राहील. आधार क्रमांक परत सुरू करण्यासाठी त्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aadhaar card issued 10 years back will have to be updated aadhaar cards not updated will be cancelled ppd 88 ssb
Show comments