मध्य रेल्वेने डिजिटल इंडिया उपक्रमाअंतर्गंत एक नवीन पाऊल टाकत आधार काऊंटर सुरू केले असून प्रशिक्षित रेल्वे कर्मचारी आधार अपडेट आणि नवीन आधार काढून देणार आहेत.या सुविधेमुळे प्रवाशांना नवीन आधार मिळवण्याची किंवा विद्यमान आधार अपडेट करण्याच्या सुविधा उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा : भंडारा : ‘क्रिप्टो करन्सी’च्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक
मोबाइल नंबर अपडेट, पत्ता बदल यांसारख्या इतर पर्यायी सुविधांसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल. ही सुविधा नागपूर स्थानकावर शुक्रवार पासून सुरू करण्यात आली असून सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता सुरू केली जाईल. या सुविधेचा सुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (टी)जयसिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन)पी.एस. खैरकर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ एस पाटील, विभागीय वाणिज्यक व्यवस्थापक व्ही. सी. थूल उपस्थित होते.