लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्धा : आता कोणत्याही शासकीय कामासाठी आधारकार्ड आवश्यक ठरले आहे. ते नसल्यास बँक खाते व अन्य नोंदणी करणे शक्य होत नाही.
आपल्या दैनंदिन जीवनाचा तो अविभाज्य भाग बनला आहे. त्याचा गैरवापर होवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक ठरते. या पार्श्वभूमीवर केंद्राने धोक्याचा इशारा देत आधार बाबत सावध केले आहे. यूआयडीएआयने आधारकार्ड धारकांना त्यांना येणारे मेसेज तपासून पाहण्याची सूचना केली.
आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! दिल्ली-नागपूरसाठी दुरांतो एक्सप्रेस लवकरच
ई मेल किंवा वॉट्स ऍप मार्फत आधार साठी कागदपत्रे शेअर करण्याची विनंती आल्यास त्यास उत्तर देणे टाळावे.आधारकार्ड ऑनलाईनच अपडेट करावे. यूआयडीएआय कधीच ई मेल किंवा अन्य माध्यमातून कागदपत्रे शेअर करण्यास सांगत नाही.जवळच्या आधार केंद्रास भेट देवून अपडेट करावे.किंवा मायआधार या संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करावी.
त्यासाठी मोफत सेवा १४ जून २०२३ पर्यंत होती.आता ही मुदत वाढवून म्हणजे १४ सप्टेंबर अशी देण्यात आली आहे.आधार सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध आहे.