अकोला : शहरातील रायलीजीन भागातून एका व्यावसायिकाचे शस्त्राच्या धाकावर चारचाकीमध्ये डांबून तीन ते चार अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या सिनेस्टाईल घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. अरुण वोरा असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अपहृत व्यावसायिकाचा शोध गेल्या दोन दिवसांपासून शोध लागलेला नाही. अखेर पोलिसांनी माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस बुधवारी जाहीर केले. पोलिसांपुढे प्रकरणाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

शहरातील दगडीपूल परिसरात अरुण वोरा यांचे रिकाम्या काच बॉटलचे दुकान आहे. रात्री काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता तीन ते चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना चारचाकी गाडीत डांबले. पांढऱ्या रंगाच्या गाडीतून भरधाव वेगात अपहरणकर्ते व्यावसायिकाला घेऊन पसार झाले. सुमारे एक ते दीड तासापासून अपहरणकर्ते व्यावसायिकाच्या मागवर होते. स्थानिक नागरिकांनी अपहरण झाल्याची माहिती दिल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर धाव घेऊन तपास सुरू केला. व्यावसायिक वोरा यांची व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल सुरू राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी  रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली असता त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरेच उपलब्ध नसल्याचे आढळून आले. घटनास्थळावर व्यावसायिक अरुण वोरा यांचा भ्रमणध्वनी पडलेला आढळून आला. पोलीस कसून तपास करीत असून शोध घेण्यासाठी पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिकाचा शोध लागलेला नाही. अखेर आज पोलिसांनी अपहृत व्यावसायिक व वाहनाचे वर्णन जाहीर केले असून त्याची माहिती देणाऱ्यासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. व्यावसायिकाचे अपहरण झाल्याने शहरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

navi Mumbai potholes repairing works
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
case against private classes teacher for beat six year old girl in dombivali
डोंबिवलीत सागावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला मारहाण करणाऱ्या खासगी शिकवणी चालिकेविरुध्द गुन्हा
Extortion from businessmen, retired officers, Food and Drug Administration
अन्न व औषध प्रशासन खात्यातील निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत भीती दाखवून व्यावसायिकांकडून वसुली
order of CIDCO Deputy Registrar to submit Building Hazardous Certificate navi Mumbai
पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
gang, police, Pune, gang attacked police,
पुणे : किरकोळ कारणातून टोळक्याकडून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

हेही वाचा >>>सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या – जामनेरमधील घटना

जुन्या व लहान वाहनातून अपहरण

अकोल्यातील व्यवसायिकाचे पांढऱ्या रंगाच्या जुन्या व लहान वाहनातून अपहरण करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांनी मारोती ८००, ऑल्टो किंवा झेन वाहनाचा गुन्हा करण्यासाठी वापर केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. माहिती देण्याचे आवाहन रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी केले आहे.