लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : अपहृत विद्यार्थीनीचा आरपीएफच्या पथकाने शोध घेतला. चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला छत्तीसगढ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरपीएफच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरुप आहे.
छत्तीसगढच्या बलरामपूर जिल्ह्यातील संजना (काल्पनिक नाव) दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. दुपारच्या सुमारास ती आजोबासोबत बाजारात सामान खरेदीसाठी गेली होती. दरम्यान आजोबा सलूनच्या दुकानात गेले तर संजना सामान खरेदीसाठी बाजारात होती. दरम्यान लाल रंगाच्या कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी तिला बळजबरीने कारमध्ये बसविले आणि घेऊन गेले. गुंगीचे औषधी दिल्याने तिची शुध्द हरपली होती. दरम्यान नरसिंहपूर जवळ ती शुध्दीत आली. नरसिंहपूर रेल्वे स्थानकाहून ती अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटली. मिळेल त्या गाडीने ती निघाली आणि नागपुरात पोहोचली.
आणखी वाचा-अनैतिक संबंधातून विनय पुणेकरचा खून; प्रेयसी साक्षी गोव्हरला अटक, प्रियकर फरार
तिकडे संजना दिसत नसल्याने कुटुंबियांनी नरसिंहपूर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली. पोलिसांनी शोध घेतला तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे तिचे लोकेशन नागपूर रेल्वे स्थानक मिळाले. या बाबत आरपीएफचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त यांना कळविण्यात आले. पोलिसांच्या मोबाईलवर संजनाचे छायाचित्र पाठविले. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर छायाचित्र पाठवून शोध घेण्यास सांगितले.
दरम्यान शोध सुरू असतानाच ती प्लेटफार्म नंबर ८ वर भयभीत अवस्थेत मिळाली. आस्थेने विचारपूस करून तिला ठाण्यात आणले. उपनिरीक्षक प्रियंका सिंह यांनी चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या उपस्थितीत तिची विचारपूस करून वरिष्ठांना माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी संजनाला संबिधीत पोलिसांच्या स्वाधीन केले.