नागपूर : कारने भरधाव जाताना तीन युवकांनी हटकल्यामुळे चिडलेल्या सुमित ठाकूरने पिस्तुलाच्या धाकावर तिघांचेही कारने अपहरण केले. त्यांना गोदामात कोंडून मारहाण करीत लुटमार केली. त्या युवकांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी सुमित ठाकूरसह त्याच्या सहा साथिदारांवर गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – नागपूर : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अभिवचन रजेवर कारागृहातून सुटला अन् फरार झाला, पण…
ठवरे कॉलनीतील कमल अनिल नाईक हा दोन मित्रांसह रविवारी रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेला होता. त्याच्या घराबाहेर उभे असताना सुमित ठाकूर व त्याची प्रेयसी कारने भरधाव तेथून गेले. कमल नाईकने आरडाओरड करीत थांबविले. त्याला कार हळू चालविण्यास सांगितले. त्याने सुमित ठाकूर नाव सांगून गुंड असल्याचे सांगितले. त्यामुळे कमलने प्रेयसीसमोरच सुमितच्या कानशिलात लगावली. त्यामुळे चिडलेल्या सुमितने पाच साथिदारांना बोलावले. तेथून कमलसह त्याच्या मित्राचे अपहरण केले. त्याला पिस्तुलचा धाक दाखवून रात्रभर चोप दिला. सकाळी ते युवक पळून पोलीस ठाण्यात पोहोचले. तक्रारीवरून सुमितवर गुन्हा दाखल करण्यात आला.