नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन कायद्याने टिकेल असे आरक्षण देण्याचा शब्द मराठा समाजाला दिला आहे. त्यातही ओबीसीला धक्का न लावता त्यावर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली जात आहे. विरोधक मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सरकार पूर्ण प्रयत्नशील असून मराठा समाजाने मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवावा असे मत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
अब्दुल सत्तार नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आहेत त्यामुळे आरक्षणाचा प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढतील. राज्यसह देशातील वेगवेगळे प्रश्न असल्यामुळे त्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. त्या अनुषंगाने मराठा समाजासाठी टिकणारे आरक्षण देण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असावी. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच सर्वांची इच्छा आहे.
विरोधकांचे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी प्रयत्न, मात्र मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवा; अब्दुल सत्तार असे का म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन कायद्याने टिकेल असे आरक्षण देण्याचा शब्द मराठा समाजाला दिला आहे. त्यातही ओबीसीला धक्का न लावता त्यावर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा केली जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in