मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत, राम मंदिराच्या निर्माणाची पाहणी केली. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह काही आमदार अनुपस्थितीत असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, नाराजींच्या चर्चांबाबत आता स्वत: मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – “एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ! रामराज्य आणायचं असेल तर…” राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार यांनी आज अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावर न जाण्यामागचं नेमकं कारण सांगितलं. “मी नाराज असतो, तर इथे आलो नसतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं म्हणजे अयोध्येत जाण्यासारखच आहे. माझ्या मनात रामाबद्दल श्रद्धा आहे. मी सुद्धा रामभक्तच आहे. मात्र, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मी अयोध्या दौरासोडून शेतपिकांच्या नुकासानिची पाहणी सुरू केली आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “देवदर्शनाला जाणं चुकीचं नाही. रामाच्या दर्शनसाठी गेलेल्या भक्तांवर अशी राजकीय टीका करणंही योग्य नाही. आज मी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी करण्यासाठी आलो आहे. सरकारच्यावतीने मी त्यांचं म्हणणं ऐकूण घेतलं. याबाबतचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची जाणीव नसती, तर त्यांनी मला रात्री १२ वाजता फोन करून तसे निर्देश दिले नसते”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.