महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त या महापुरुषांच्या विचारांचा प्रचार- प्रसारासाठी महावितरणच्या बुटीबोरी ग्रामीण कार्यालयतर्फे अभ्यासिका (स्टडी रूम ) सुरू करण्याच्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. त्यानिमित्त या महापुरूषांची पुस्तके नागरिकांना महावितरण कार्यालयात वाचायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महावितरणची ही अभ्यासिका सहाय्यक अभियंता बुटीबोरी ग्रामीण कार्यालयात १५ एप्रिल २०२३ पर्यंत रोज संध्याकाळ ७ वाजे पर्यंत सुरू राहिल. यामध्ये महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांची ३६ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहे. उपक्रमाचा आरंभ बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गाणार, उपकार्यकारी अभियंते गवते व चरपे उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक अभियंता शिंगाडे यांनी केले. तर संचालन वरिष्ठ तंत्रज्ञ धर्मपाल चोकांद्रे व आभार प्रधान तंत्रज्ञ केशव सूर्यवंशी यांनी मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhyasika of mahavitaran spreading the thought of mahapurusha mnb 82 amy
Show comments