नागपूर : राज्यातील जंगलांवर एकीकडे प्रकल्पांचे आक्रमण होत असतानाच दुसरीकडे वणव्यांमुळे जंगल मोठ्या प्रमाणात नाहीसे होत असल्याचे भारतीय वनसर्वेक्षणच्या अहवालातून समोर आले आहे. संपूर्ण राज्यात एक लाख ७० हजार ६६०.०८७ हेक्टर जंगल वणव्यात नाहीसे झाले.२०२१ हा करोनाकाळ असताना देखील राज्यात ६३ हजार ८४६ वणव्यांचे ‘अलर्ट’ आले.
ज्यात सर्वाधिक अलर्ट गडचिरोली जिल्ह्यात आले. २०१८ ते २०२३ या कालावधीत याच जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ५२७ वणव्याच्या घटना घडल्या. ज्यात ३३ हजार ८७०.४५३ हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. गडचिरोलीपाठोपाठ कोल्हापूर, ठाणे, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वणव्याचे ‘अलर्ट’ आलेत. तर वणव्याच्या घटना या जिल्ह्यांसह अमरावती जिल्ह्यात नोंदवण्यात आल्या. २०१८ साली राज्यात वणव्याच्या ८,३९७ घटना घडल्या. ज्यात ४४,२१९.७३ हेक्टर जंगल जळाले. २०१९ साली ७,२८३ वणव्याच्या घटनांमध्ये ३६,००६.७२७ हेक्टर जंगल जळाले.
हेही वाचा >>>बुलढाणा: मलकापुरात निसर्ग कोपला! ‘कोसळधार’मुळे शेती पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी
२०२० साली ६,३१४ वणव्यच्या घटनांमध्ये १५,१७५.९५ हेक्टर जंगल जळाले. २०२१ मध्ये १०,९९१ वणव्याच्या घटना घडल्या. ज्यात ४०,२१८.१३ हेक्टर जंगल जळाले. २०२२ मध्ये ७,५०१ वणव्याच्या घटना २३,९९०.६७ हेक्टर जंगल जळाले. २०२३ मध्ये ४,४८२ वणव्यच्या घटनांमध्ये ११,०४८.८८ हेक्टर जंगल जळाले.