नागपूर: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात असल्याचे विरोधकांकडून सातत्याने सांगण्यात येते. तसेच, येत्या काळात महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील, असा ठाम दावाही केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार अपात्रतेच्या सुनावणीवरूनही अनेक चर्चा रंगत आहेत. अशातच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नागपुरात झालेल्या दोन कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झालेल्या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री शिंदे मुख्य अतिथी असतानाही आले नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र, ते राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात न दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा… देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी डॉ. आंबेडकरांवर दबाव होता; माजी खासदार डी. राजा यांचे विधान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर होत्या. मात्र, राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दांडी मारली. मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी नागपूरला उशिरा आल्याने राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला गेले नाही. उलट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वडिलांच्या नावे होऊ घातलेल्या रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित होते. सायंकाळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवालाही हजेरी लावली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absence of chief minister eknath shinde from two programs of president draupadi murmu in nagpur dag 87 dvr