वर्धा: काँग्रेसच्या कोणत्याही उपक्रमापूर्वी किंवा नंतर पत्रकार परिषद घेवून कार्यक्रमाची माहिती देण्याची सूचना प्रदेश कार्यालयाकडून येते. तसे पत्रकच जाहीर होते. यास जिल्ह्यातील प्रमुखांनी संबोधित करावे, अशाही सूचना असतात.

मात्र त्यास नाकारण्याची हिम्मत केवळ आमदार रणजीत कांबळे दरवेळी दाखवितात. यावेळी काँग्रेसचे महासंमेलन नागपुरात आयोजित आहे. त्यानिमित्त जिल्हाध्यक्ष चांदूरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.

हेही वाचा… शाळांमध्ये जमतेय ताला-सुरांची गट्टी, स्नेहसंमेलनामुळे चिमुरडे रमले कलाविश्वात

मात्र जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले रणजीत कांबळे यांनी नेहमीप्रमाणे पत्रपरिषदेकडे पाठ फिरविली. गेल्या दोन महिन्यात काँग्रेसच्या झालेल्या पत्रकार परिषदेत ही कांबळे यांची सलग पाचवी अनुपस्थिती होती. याची दखल जिल्हा निरीक्षक जिया पटेल व अन्य घेतात. पण मग म्हणतात, ते येत नाही त्याला काय करणार.

Story img Loader