नागपूर: सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी शांतीनगर येथील विशाल राष्ट्रपाल गजभिये यास २० वर्षांचा कारावास सुनावला. २२ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी पीडित मुलगी परिसरातील मुलींसह चोर-पोलीस खेळत होती. या दरम्यान ती विशालच्या घरासमोर मुलगी गेली असताना त्याने तिचा हात पकडून तिला घरात खेचले आणि दार बंद केले. त्यामुळे तिच्या मैत्रिणी तेथून आपआपल्या घरी निघून गेल्या. विशालने तिचा विनयभंग करून तिचे लैंगिक शोषण केले.  घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगितला. त्यांनी शांतीनगर पोलिसात धाव घेतली.

हेही वाचा : नागपूर : ‘यू-ट्युब’ बघून प्रयोग करण्याचा उपद्व्याप विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला

 याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विशालला अटक केली. न्यायालयात आरोपी विशालवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश पांडे यांनी त्याला २० वर्षांची शिक्षा आणि २० हजार रुपये दंड सुनावला. दंडापोटी आलेली रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश सुद्धा दिले. आरोपीच्या वतीने अॅड. अमित बंड यांनी तर सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील आसावरी परसोडकर आणि शाम खुळे यांनी बाजू मांडली.

Story img Loader