बुलढाणा : संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे,’वासना तुराम न भयम न लज्जा’. अर्थात वासनेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ना लाज शरम राहते, ना आपल्या विकृतीचे भय राहते. वासनेच्या आहारी गेलेली माणसे कधी काय आणि कुणासोबत काय करतील याचा नेम नाही. यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील डोणगाव पोलीस ठाणे हद्दीत एका वासनांध नराधमाचा असाच विकृत कारनामा समोर आला आहे. चक्क दोन मुलांचा बाप असलेल्या या नराधमाने अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा… सावधान! राज्यात जलजन्य आजाराचे १४ बळी; सर्वाधिक मृत्यू अतिसारामुळे…

मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील राहणारा आहे. अमोल विजय लोखंडे असे या विकृत बुद्धीच्या नराधम आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची असून डोणगाव परिसरातील राहिवासी आहे. आरोपीने ७ डिसेंबर रोजी फूस लावून आणि लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळवून नेले होते. त्याने मुलीला दूरवरच्या नाशिक येथे नेले, तिथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला.

आरोपीची शरणागती

दरम्यान इकडे मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे शोधूनही मुलगी न सापडल्याने डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात आधी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध घेण्यासाठी पथके निर्माण केली. दरम्यान पोलीस मागावर असल्याची माहिती आरोपी अमोल याला मिळाली. त्यामुळे तो लपून छपून राहत होता.

हे ही वाचा… अस्तित्वहीन ‘शकुंतला’ रेल्‍वेचा वाढदिवस साजरा, दिव्यांची आरास…

अखेर ३१ डिसेंबरला तो स्वतःहून मुलीला घेऊन रिसोड तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला. ही माहिती डोणगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिरपूर पोलिसांकडून अमोलला ताब्यात घेतले. यावेळी पीडित मुलीने आपल्या जबाबात आरोपी अमोलने लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर आधीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात बाललैंगिक अत्याचाराचे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. घटनेचा तपास डोणगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abuse of minor girl accuded surrender to police in buldhana district scm 61 asj