नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी स्वीय सहायक यांच्या कार्यालय आणि सरकारी निवासात एसी ( वातानुकूलित यंत्र) लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ( विद्युत) ९ लाख ४४ हजार  रुपयांचा निविदा काढल्या आहेत. त्या वादात सापडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अनिल देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, प्रस्ताव कोणी कोणाला दिला ?

उपमुख्यमंत्र्यांचे नागपुरात देवगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तेथेच स्वीय सहाय्यकाचे कार्यालय आणि निवासस्थान आहे. तेथे एसी लावण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेनुसार ही नियमित प्रक्रिया आहे. देवगिरी हा उपमुख्यमंत्र्यांचा बंगला असून तेथील सर्व खोल्या व कार्यालये वातानुकूलित असते. जनमंचने या उधळपट्टीचा निषेध केला आहे. बाजारात सामान्यपणे ४० ते ५० हजार रुपयात चांगले वातानुकूलित यंत्र मिळते. मग इतका खर्च कशासाठी. खासगी स्वीय सहाय्यक हे सरकारी पद नाही. त्यामुळे त्याच्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखो रूपये खर्च करणे चूक आहे, अशी टीका आता या प्रकरणात होऊ लागली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac tender cost rs 9 lakh 40 thousand for office of deputy chief minister s private personal secretary in dispute cwb 76 zws