बुलढाणा: भरधाव मालवाहू वाहन व महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
लाखनवाडा (तालुका खामगाव) ते उदयनगर (तालुका चिखली) मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी ही दुर्घटना घडली. खामगाव एसटी बस आगाराची ही बस २० विद्यार्थ्यांसह ४७ प्रवासी घेऊन उदयनगर कडे निघाली होती. दरम्यान, पिंप्री कोरडे नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन व बसची धडक झाली.
हेही वाचा… आंतरराज्य जनावरे तस्करी; १० जणांविरुद्ध गुन्हा
धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे समोरील भागाची (चालक कक्षची) मोडतोड झाली. यामुळे दोन्ही चालक गंभीर जखमी झाले तर विद्यार्थी व प्रवासी किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांची मोडतोड झाली. माहिती मिळताच पोलीस व एसटी विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
First published on: 05-12-2023 at 14:03 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident between goods vehicle and a st bus near chikhli in buldhana both drivers were seriously injured passengers including students also injured scm 61 dvr