गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहखाण उत्खनन करताना अपघात झाल्याने तरुण अभियंत्यासह दोन परप्रांतीय मजूर असे एकूण तिघेजण ठार झाले. ही घटना ६ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

सोनल रामगीवार (वय २६, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरयाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरयाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरू आहे. या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली कोसळले, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळले. तेथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीवार व अन्य दोघे ठार झाले. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
Two youths die while performing stunts on two wheelers after drinking alcohol
नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू

हेही वाचा – लोकसभा निवडणूकीनंतर ठाणे आणि पुणे हे दोघेही जातील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट

हेही वाचा – जिल्हा परिषद भरती : परीक्षा शुल्काबाबत उमेदवारांची नाराजी;एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करणाऱ्यांना भुर्दंड

या घटनेत मृत्यू झालेले अभियंता सोनल रामगीवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती झाल्यावर धक्का बसला. नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण सुन्न झाले होते.

Story img Loader