लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नजीक आज झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. यामुळे मलकापूर परिसर हादरला आहे.

या घटनेचा विस्तृत तपशील प्राप्त झाला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मुक्ताई नगर मार्गावर जगगु मामा धाब्यानजीक ही दुर्घटना घडली. आयशर व ट्रॅव्हल्स भरवेगात एकमेकांना धडकले. यामुळे चौघे जण जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हे वृत्त लिहिपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident near malkapur collision between eicher and traves four died scm 61 mrj
Show comments