नागपूर : सीताबर्डीतील गोवारी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला असून जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांवर धडकली. या अपघात दोन जण जखमी झाले असून वाहनांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.वाहतूक पोलीस आणि सीताबर्डी पोलिसांनी पुलावर पोहचून अपघातग्रस्तांना मदत केली. वाहतूक बंद करुन रस्ता मोकळा केला. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वामन बापूराव नेवारे (४५, मटकाझरी) हे मंगळवारी सकाळी कारने उमरेडला जात होते.बर्डीच्या गोवारी उड्डाणपुलावरुन जात जात असताना समोरील कारने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे मागे असलेल्या वामन नेवारे यांची कार पुढील वाहनावर आदळली व आडवी झाल्यामुळे मागून येणारी दुसरी कार नेवारेंच्या कारवर धडकली. त्यानंतर उड्डाणपुलावरुन सुसाट जाणारी वाहने एकमेकांवर धडकायला लागली. काही सेकंदातच उड्डाणपुलावरील जवळपास १२ ते १५ वाहने एकमेकांवर धडकल्या. यामध्ये काही ऑटो, कार, आयशर ट्रक आणि एका स्कूलव्हँनचा समावेश आहे.

Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
MHADA mega list draw scam No inquiry report on draw even after year
म्हाडा बृहतसूची सोडत गैरप्रकार : एक वर्षानंतरही सोडतीचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात

हेही वाचा…सुशिक्षित बेरोजगार अभियंते म्हणतात आमच्यावर अन्याय”, काय आहे कारणे ?

या विचित्र अपघातामुळे उड्डाणपुलावरुन जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात नेवारे यांच्यासह राजेश शेंडे (चिमुरकर लेआऊट, हुडकेश्वर) हेसुद्धा किरकोळ जखमी झाले. काही मिनिटातच उड्डाणपुलावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. सीताबर्डी पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे पथक काही मिनिटातच उड्डाणपुलावर आले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांना एका बाजूला करण्याचा प्रयत्न केला. गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे काही वाहनचालकांमध्ये वाद सुरु होते. चालकांशी संवाद साधून त्यांची समजूत घातली. शेवटी या अपघाताची नोंद सीताबर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली.

समाजमाध्यमावर ‘व्हिडिओ व्हायरल’

गोवारी उड्डाणपुलावर विचित्र अपघात झाल्यानंतर काही कारचालकांनी रस्त्यावर उतरुन वाद घालणे सुरु केले. तर काहींनी मोबाईलने व्हिडीओ काढले. ते अनेक समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. या अपघातातील वाहनांची स्थिती बघता गंभीर स्वरुपाचा अपघात असल्याचे दिसत आहे. मात्र, या अपघातात दोन कारचालक किरकोळ जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा…नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटले ‘या’ नवीन नावाने…

दोन तास वाहतूक ठप्प

रहाटे कॉलनी चौक ते थेट झिरो माईल चौकात पोहचण्यासाठी गोवारी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. मात्र, कार एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक जवळपास दोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे उड्डाणपुलाखालील मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. जनता चौक, पंचशील चौक आणि व्हेरायची चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे दोन पथके उड्डाणपुलाखाली तैनात करण्यात आली होते.

Story img Loader