पुलाचे बांधकाम करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गुजरातच्या मोरबी येथील पुलाचे बांधकाम मजबूत असले तरी १४२ वर्षे जुन्या पुलावर प्रमाणापेक्षा अधिक क्षमतेने लोक असल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज मुंबई येथील अभियंते विनोद पात्रिकर यांनी व्यक्त केला. द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर आणि असोसिएशन ऑफ कौन्सलिंग सिव्हिल इंजिनिअर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोरबी पूल दुर्घना: कारण आणि शिकवण’ या विषयावर आयोजित व्याख्यानात विनोद पात्रिकर बोलत हाेते. यावेळी एसीसीईचे अध्यक्ष पी.एस. पाठणकर, मिलींद पाठक उपस्थित होते. पात्रिकर म्हणाले की, मोरबी येथील हा १४२ वर्षे जुना होता. तारांवर त्याचे वजन होते. इतका जुना पूल असल्याने त्याच्या तारांमध्ये जीर्णता येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>नागपूर : चिंताजनक! शहरात ९०० हून अधिक इमारती जीर्ण
त्यामुळे १४२ वर्षे जुना पूल किती वजन सहन करू शकते हे तपासणे आवश्यक होते. तसे न झाल्याने प्रमाणापेक्षा अधिक लोक या पुलावर एकाचवेळी आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते. याशिवाय या पुलाची लांबी ही खूप जास्त होती. तारांच्या भरवशावर उभा असणाऱ्या पुलाची इतकी लांबी असणे हे सुद्धा एकप्रकारे गंभीर आहे. दुर्घटनेसाठी हे एक कारण असू शकते. यावेळी पात्रिकर यांनी पूल बांधकाम करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेणे आपेक्षित आहे यावरही मार्गदर्शन केले. खराब बांधकाम, चुकीच्या डिझाईनमुळेही पुलांना धोका असतो. त्यामुळे पुलाचे बांधकाम सुरू असताना प्रत्येक अभियंत्याने त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे.
हेही वाचा >>>नागपूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व ; काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती
तयार करण्यात आलेल्या डिझाईननुसारच बांधकाम होते का? हे पाहणे फार आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. पूल बांधकामात असलेल्या मजुरांचे मतही लक्षात घेणे आवश्यक आहे. याशिवाय पुलावरील प्रवाशांचे अनुभवही लाभदायक ठरतात. त्यांना या बांधकामात काही उणिवा दिसतात का? याची माहिती घेणे अभियंत्यांसाठी फायद्याचे असते. कार्यक्रमाला द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>‘मनरेगा’ आयुक्तालयातच ५२ टक्के पदे रिक्त
दर्जेदार बांधकाम करणाऱ्यालाच कामे द्यावी
या पुलाच्या बांधकामाला झालेली वर्षे लक्षात घेता यावरून ४००च्या जवळपास लोक एकाच वेळी प्रवास करत होते. अशा अनेक बाबी या दुर्घटनेला कारणीभूत आहेत. बांधकामासाठी काढण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवणे आवश्यक आहे. केवळ कुणी कमी किंमतीमध्ये काम घेते म्हणून त्याला कंत्राट देण्यापेक्षा दर्जेदार बांधकाम करणाऱ्यालाच काम द्यायला हवे, असेही पात्रिकर म्हणाले.