बुलढाणा : अपघातानेच गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एका अपघाताची नोंद झाली. मंगळवारी उत्तररात्री दुसरबीड ( तालुका सिंदखेडराजा) जवळ खासगी प्रवासी बस दुभाजकला धडकल्याने वाहक दगावला तर आठ प्रवासी जखमी झाले. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
नागपूर येथून शिर्डीकडे जाणारी (एमएच ४०-सीडी-८३७६ क्रमांकाची )ट्रॅव्हल्स बस दुसरबीड नजीक दुभाजकाला धडकली. यात बसचा क्लिनर उल्हास दुबे हा ठार झाला. तसेच आठ प्रवासी जखमी झाले. महामार्ग पोलीसच्या सूत्रानुसार चालक मंगेश कुळवंते याला डुलकी लागल्याने अपघात झाला. चालक सध्या बेशुद्ध आहे. माहिती मिळताच एपीआय बकाल व त्याचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. या बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते.
First published on: 23-05-2023 at 17:06 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on samriddhi highway after a private bus collided with a divider scm 61 amy