लोकसत्ता टीम

यवतमाळ : बीड येथील निवडणूक बंदोबस्त आटपून गडचिरोलीकडे जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या वाहनाला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. ही धक्कादायक घटना धामणगावजवळील समृद्धी महामार्गावर गुरूवारी दुपारी घडली. या अपघातात एक जवान जागीच तर दुसऱ्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गिरीष कुमार (४२, रा. केरळ) आणि मिठा तेजश्वरराव (३६, रा. आंध्रप्रदेश) अशी मृत जवानांची नावे आहेत. तर अब्दुल रफ असे जखमी जवानाचे नाव आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
demand for ransom of Rs 2 crore case filed against three including Valmik Karad in kej
दोन कोटींच्या खंडणीची मागणी; वाल्मीक कराडांसह तिघांवर केजमध्ये गुन्हा
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, लोकसभा निवडणूक मतमोजणी बंदोबस्तासाठी सीआरपीएफचे जवान बीड येथे आले होते. बंदोबस्त आटोपल्यानंतर जवानांचे वाहन बीड येथून गडचिरोलीकडे निघाले होते. अश्यात गुरूवारी दुपारी धामणगावजवळील समृध्दी महामार्गावर भरधाव ट्रकने सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला मागच्या बाजूने धडक दिली. या धडकेत मिठा तेजश्वरराव या जवानाचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीष कुमार आणि अब्दुल रफ गंभीर जखमी झाले होते.

आणखी वाचा-१३ वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकराचे नाव…

दरम्यान रूग्णवाहिकेच्या मदतीने जखमी जणांना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सायंकाळी गंभीर जखमीमधील गिरीष कुमार या जवानाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अब्दुल रफ यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी रूग्णालयात भेट देवून जखमी जवानांची चौकशी केली. शवविच्छेदनानंतर मृत जवानांचे शव नागपूर विमानतळावरून त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिली.

आणखी वाचा-६ कोटींचा धानखरेदी घोटाळा, तत्कालीन व्यवस्थापकासह कनिष्ठ सहायकास अटक

या अपघातातील जखमींना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आल्यानंतर प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत जवानांना तत्काळ उपचार करण्यासाठी तत्परता दाखवली. स्वतः जिल्हाधिकारी रुग्णालयात पोहचले. त्यांनी जखमी जवानांची आस्थेने चौकशी केली. या जवानांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. मृत जवानांचे मृतदेह त्यांच्या मुळ गावी पाठविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी यंत्रणेस कामी लावले. गडचिरोली सीआरपीएफशी समन्वय साधून परिस्थिती हाताळली.

दरम्यान, समृध्दी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढल्याने या महामार्गावर जागोजागी अपघात नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.

Story img Loader