नागपूर : सिंदखेडराजा येथे विदर्भ ट्रॅव्हलच्या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी (रविवारी दुपारी १२.३० वाजता) नागपुरातील प्रवेशद्वारावर एका कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिली. ट्रॅक्टर आणि चौकाच्या ग्रीलमध्ये चेपून दोन मजूर गंभीर जखमी झाले. आत्माराम यादव, कृष्णा यादव अशी जखमींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समृद्धी महामार्गाच्या प्रवेश द्वारावर दोन मजूर गवत कापण्याचे काम करत होते. हे कापलेले गवात ठेवण्यासाठी तिथे एक ट्रॅक्टर उभा होता. गवत कापल्यावर मजूर ते ट्रॅक्टरमध्ये टाकत होते. मजूर गवत ट्रॅक्टरमध्ये टाकत असताना मागून आलेल्या एका कंटेनरने ट्रॅक्टरला धडक दिली. त्याने ट्रॅक्टर पुढे सरकला. त्यामुळे दोन्ही मजूर समृद्धीच्या प्रवेशद्वारावरील चौकाची ग्रील आणि ट्रॅक्टरच्या मधात चेपल्या गेले. या घटनेने तेथे खळबळ उडाली.

हेही वाचा – Buldhana Bus Accident: मृत्यूचा दाखला ठरतोय खबरदारीची बाब, प्रशासन अत्यंत सतर्क

तातडीने दोघांना एम्स रुग्णालयात हलविण्यात आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताने पुन्हा समृद्धी हा अपघाताचा महामार्ग आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाचा तपास हिंगणा पोलीस करत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on samruddhi highway for the second day in a row two people in critical condition mnb 82 ssb