नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वाहतुकीदरम्यान अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांना वेळीच वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत असून रुग्णांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित केल्यास मृत्यूचे व अपंगत्वाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – बुलढाणा : देऊळगाव राजा गांजा तस्करीचे केंद्र? तब्बल २४ किलो गांजा जप्त

हेही वाचा – वन शहीद दिन आणि जोधपूर किल्ल्याचा काय संबंध माहितीये? ११ सप्टेंबर १७३० ला जे घडले ते इतिहासात…

“लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर हे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित भव्य रुग्णालय असून येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत योजना) अनेक वर्षांपासून यशस्वीरीत्या कार्यरत असून रुग्णांना अविरत नि:शुल्क वैद्यकीय उपचार प्रदान केले जातात. राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह येथे समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना नि:शुल्क वैद्यकीय उपचार मिळणार असून चांगली सेवा प्रदान करण्यास रुग्णालय कटिबद्ध आहे”, असे डॉ. काजल मित्रा यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी जितेंद्र मुळे (९९२३०४१९०७) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident victims on samruddhi highway will get free treatment here learn about the scheme rbt 74 ssb