नागपूर : एका गुन्ह्याच्या तपासासाठी मध्यप्रदेशात गेलेल्या वाठोडा पोलीस ठाण्यातील चमूचा अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. दगावलेल्या कर्मचाऱ्याने बेसामध्ये नवीन घर बांधले. लवकरच गृहप्रवेश होणार होता. परंतु त्यापूर्वीच या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला.

हेही वाचा – नागपूर : क्रांतिकारी पद्धतीने नाही, संविधानाला धरून निर्णय घ्या, अतुल लोंढे यांचे विधानसभा अध्यक्षांना आवाहन

नंदू कडू असे दगावलेल्या कर्मचाऱ्याचे तर सचिन श्रीपाद आणि राधेश्याम खापेकर अशी गंभीर जखमींची नावे आहेत. वाठोडा पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी नंदू कडू आणि इतर दोघे मध्यप्रदेशात गेले होते. येथे अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान नंदू कडू यांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांवर उपचार सुरू आहे.

Story img Loader