वर्धा : युवक घरीच मृत आढळला म्हणून पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून दफ्तरी नोंद केली.पण निघाले भलतेच. मृताचे वडील टाहो फोडत आल्लीपुर ठाण्यात पोहचले. या ठाण्या अंतर्गत येणाऱ्या कात्री या गावच्या नंदकिशोर मंगल नन्ने असे मृताचे नाव आहे. वडील मंगल नांने यांनी मुलाला मारून त्याचा मृतदेह घरी पलंगावर आणून टाकल्याची तक्रार केल्यावर पोलीस कामाला लागले.
नंदकिशोर याचा दीपक उदयभान नांने सोबत वाद झाल्याचे कळले. शंभर रुपयांच्या वादापोटी आरोपी दीपकने हा खून केल्याचे स्पष्ट झाले.पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास नव्याने सुरू केला. आरोपी दीपक याच्या घरी पोलीस पोहचले तेव्हा तो फरार झाल्याचे दिसून आले.अधिक तपास केल्यावर तो नदीच्या पात्रात दडून असल्याची माहिती पुढे आली.पोलीसांनी अखेर त्याला पात्राच्या काठावरून अटक केली.या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.