नागपूर : जीवनातील बऱ्याच गोष्टी आपल्या दैनंदिनीत महत्त्वाच्या असतात. परंतु काही खेळ हे जीवघेणे ठरतात. त्यावर जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉ. संजय ढोबळे यांनी पंतगीमुळे कुठल्या दुर्घटना घडतात याची माहिती दिली आहे. पंतग उडवण्याचा उत्साह आणि नायलॉन मांजामुळे कुठल्या प्रकारच्या जीवघेण्या घटना घडतात याची थक्क करणारी माहिती ढोबळे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अशा आहे दुर्घटना:

१. पतंग उडवितांना पतंगीला लागलेला मांजा रस्त्यावरून जात आहे. तो थोडा खाली आल्यास ताण असलेला मांजा एक धारदार शस्त्र म्हणून त्या वाटेवरून जाणाऱ्या लोकांच्या किंवा सायकल, मोटार सायकल वरून जात असलेल्याच्या गळयात किंवा शरीराला अडकून फार मोठी इजा करतो.

२. पतंग उडवित असताना रस्त्यावरील मांजा एखाद्या गाडीवर (मोटर सायकलवर) समोर बसलेल्या छोट्या मुलास फार मोठी इजा करतो. इतकेच नव्हेतर त्या बालकाचा मृत्यूसुध्दा होऊ शकतो.

हेही वाचा : “पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा

३. पतंगीचा मांजा ओव्हरब्रिज वरून जात असेल तर तो सहज येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या गळ्यात अडकून इजा करतो.

४. पतंग कापली गेली असेल तर पतंगीचा मांजा झाडाला अडकतो. कधीतरी हवेचा ताण येऊन तो प्रवाश्यांच्या पायाला किंवा अंगाला इजा करतो.

५. कापलेल्या पंतगीचा मांजा व पतंग लुटण्यासाठी बेपर्वा धावणारी मुले रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीमुळे दुघटनेत बळी पडतात. इतकेच नव्हेतर कधी ही मुले नाली किंवा मोठ्या खोल गड्यात व पाण्यात पडून मृत्युमुखी पडतात.

६. छतावरून पंतग उडवित असताना उत्साहामध्ये खाली पडून दुर्घटना होते व मृत्युमुखी पडतात.

७. पतंगीला लागलेला मांजा हा नायलॉनचा असेल तर फार मोठ्या ताणामध्ये एक धारदार शस्त्र बनवून एखाद्या व्यक्तीला मृत्युच्या दारात नेण्यासाठी एक कारण ठरते.

हेही वाचा : नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय

८. पतंगीच्या नादात कित्येक भांडणे बघायला मिळतात. तर कोणते भांडण एक दुसऱ्यांचा जीव घेईल याची कल्पना आपण करू शकत नाही.

९. झाडाला अडकलेल्या मांज्यात व पतंगीसोबत उडणाऱ्या मांज्यात पक्षी येत असून त्यांना अपंगत्व स्विकारावे लागते किंवा त्यांना मरण पत्करावे लागतात.

१०. पतंगीच्या मांज्यामध्ये बारीक काच व अन्य विषारी रसायन असतात. ती शरीरात गेल्यास जीवाला धोका निर्माण होतो.

११. पतंग उडवित असताना मांज्यामुळे हात कापले जातात. यापेक्षा मोठी घटना काय ठरणार याची कल्पनाही करणे कठीण आहे.

१२. पतंगीसाठी मैदान किंवा मुख्य ठराविक जागा नसतात. त्यामुळे घनदाट जनसंख्या असलेल्या वस्तीमधे राहणाऱ्या व्यक्तींना दुर्घटनेला समोर जावे लागते.