वाशीम : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील वनोजा इंटरचेंजपासून ७ किमी अंतरावर संभाजीनगर येथून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्यूनरची (क्र.जी.जे.२७ के.८२७१) कठड्याला धडक बसली. ही घटना आज ६ मार्च रोजी घडली. यामधे गुजरात येथील सीमा गोयल (५०), श्यामदास गोयल (५५) गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी या रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर जनतेसाठी खुला करण्यात आला. मात्र, तेव्हापासून आजपर्यंत या महामार्गावर अपघाताची मालिका कायमच आहे. आज सकाळी ११  वाजतादरम्यान वाशीम जिल्ह्यातील वनोजा इंटरचेंजपासून ७ कि.मी. अंतरावर संभाजी नगरकडून नागपूरकडे जात असलेल्या फॉर्च्युनरची कठड्याला धडक बसली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना अकोला येथे पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले.

हेही वाचा >>> यवतमाळ : एकाच दिवशी तीन मृतदेह आढळल्याने खळबळ

रुग्णवाहिका विलंबाने दाखल

समृद्धी महामार्गावर वाढते अपघात चिंताजनक असून अपघात घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने १०८ वर फोन करून रुग्णवाहिकांना माहिती दिली. मात्र तब्बल तासाभराने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. यामुळे अपघातग्रस्तांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या महामार्गावर रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्यामुळे अपघातग्रस्तांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, असा आरोप केला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidents on samriddhi highway do not stop fortuner hits cliff two injured pbk 85 ysh