बैठी जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवईंसह इतर कारणांमुळे सगळ्याच वयोगटात लठ्ठपणा वाढला आहे. त्यामुळे बरेच व्यक्ती झटपट वजन कमी करण्यासाठी समाज माध्यमावरील चलचित्र बघून मनमानी उपाय करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याविना या झटपट वजन कमी केल्यास शरीरातील रसायनांचे संतुलन बिघडून केस गळतीसह डोळ्या खालील त्वचा काळी पडण्याचा धोका वाढतो, असे मत त्वचारोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा महल्ले यांनी व्यक्त केले.लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता त्या बोलत होत्या. प्रत्येकाच्या शरीराला आवश्यक प्रोटीन, व्हिटॅमिन्ससह इतरही घटकांची गरज आहे. हल्ली समाज माध्यमांवर आहाराबाबत काहीच माहिती नसलेल्यांकडूनही लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय सांगण्यात येतात. हे उपाय खरेच फायद्याचे की हानीकारक हेही कुणाला माहीत नसते. त्यानंतरही अनोळखी व्यक्तींच्या दाव्यावर विश्वास करून काही जण या उपायानुसार लठ्ठपणा कमी करण्याचे प्रयत्न सुरू करतात. त्यामुळे काहींच्या शरिरातील प्रोटिन्स, व्हिट्रमिन्सची मात्रा विस्कळीत होते.
हेही वाचा >>>नागपूर : बदनामी होऊ नये म्हणून आईचे दागिने केले प्रियकराच्या स्वाधीन
शरीरातील रसायनांचे प्रमाण असंतुलित होऊन संबंधितांना केस गळती, डोळ्याखालील त्वचा काळी पडणे, हातावर चट्टे येण्याचाही त्रास होतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्याशिवाय वजन कमी करण्याचे उपाय करणे धोकादायक असल्याचेही डॉ. महल्ले यांनी सांगितले. दरम्यान, करोना काळात मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या नावावर व्हिटॅमिन सी, मल्टिविटॅमिनसह होमिओपॅथी आयुर्वेदिकच्या विविध गोळ्या, काढ्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले. त्यापैकी बऱ्याच नागरिकांनाही केस गळतीसह त्वचेचे विकास झाल्याचे निरीक्षण त्वचारोग तज्ज्ञांकडून नोंदवले गेले. माझ्या क्लिनिकलाही विविध आजारांवर उपचारासाठी आलेल्यांचा इतिहासात हा प्रकार आढळल्याचेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर : आता यंत्रमानव करणार महापालिकेच्या मलवाहिनीची स्वच्छता
लठ्ठ व्यक्तीला त्वचारोगाचा धोका अधिक
लठ्ठपणा त्वचेच्या अनेक आजारांशी संबंधित आहे. त्यात मखमलीसारखे गळद चट्टे, त्वचेवरील मोस, काटेरी पुरळ, शरीरावरील अनावश्यक केस, स्ट्रेच मार्क्स, दुहेरी अनुवट्या, केस गळणे व पातळ होण्यासह इतरही आजारांचा समावेश आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये मधुमेह आणि बिघडलेल्या रक्ताभिसरपण यासारख्या परिस्थितीसोबत असल्यास वरील त्वचेच्या संक्रमनाचा धोका संभवतो. हा फेअरनेस क्रिम चेहरा विद्रूप करू शकतातकोरडी वा ऑईली त्वचा, त्याला असलेले विकार व शरीरयष्टीसह इतर गोष्टी बघूनच त्वचारोग तज्ज्ञाकडून कोणते क्रिम कुणाला फायद्याचे हे निश्चित करू शकतो. परंतु चुकीचे क्रिम लावून अनेकांचे चेहरे विद्रूप वा त्यावर चट्टेही पडू शकतात, असेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.
हेही वाचा >>>‘दिवाळी ऑफर’च्या नावावर सायबर गुन्हेगारांकडून लूट! ; कमी किंमत, एकावर एक मोफत योजनेचे आमिष
सतत वातानुकूलित यंत्रात बसणे चुकीचे
प्रत्येक व्यक्तीने सकाळचा काही वेळ अंगावर सूर्यप्रकाश घेणे फायद्याचे आहे. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. घरात व कार्यालयात सतत वातानुकूलित यंत्रात (एसी) बसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या व्यक्तींमध्ये शरीरातील आर्द्रता कमी होऊन त्वचा कोरडी होऊन त्वचेचे काही आजार संभावतात. त्यामुळे या व्यक्तींनी अधून- मधून एसी बाहेरही काही वेळ घालवण्याची गरज असल्याचेही डॉ. महल्ले म्हणाल्या.