धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमस्थळी महालेखाकार (लेखा व हकदारी)-२ कार्यालयातर्फे एक दालन (क्र. जी-१५५-ए) उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या दालनाचे उद्घाटन २१ ऑक्टोबरला सेवानिवृत्त सनदी अधिकारी पी. टी. ढोले यांच्या उपस्थितीत व महालेखाकार दिनेश रायभान पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वाजता करण्यात येणार
आहे. २२ ऑक्टोबरला दिवसभर हे दालन सुरू राहणार आहे.
या दालनात महालेखाकार कार्यालयाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून सेवानिवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधीसंबंधी मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
या दालनास भेट देऊन सेवानिवृत्तीसंबंधी मार्गदर्शन प्राप्त करावे, जेणेकरून सेवानिवृत्त झाल्यावर लगेच त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन महालेखाकार कार्यालयातर्फे सर्व राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांना करण्यात आले
आहे.